आंबगाव-रूपणवाडी येथे पुराच्या पाण्यात वाहून तरुणाचा मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील आंबगाव-रूपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सोमवारी सायंकाळी ही घटना समजल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती, परंतु रात्रीच्या अंधारामुळे ती थांबवण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी शरद लोहकरे, श्री. धोत्रे, श्री. सावंत, पोलिस हवालदार घटनास्थळी दाखल झाले होते. कालपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने रूपणवाडी येथील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून जात असताना प्रशांत दळवी हे वाहून गेले होते.

आज सकाळी कुणकेरी येथील रवीच्या भाडे येथे प्रशांत दळवी यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यावेळी यावेली सरपंच शिवाजी परब, पोलीस पाटील लक्ष्मण गावडे, उपसरपंच रमेश गावडे आदी उपस्थित होते.

दळवी यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. या घटनेने आंबगाव-रूपणवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

You cannot copy content of this page