Headlines

मालवण ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी…

⚡मालवण ता.०६-:मालवण ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मालवण येथील ज्येष्ठ लेखक, मुक्त पत्रकार, मुद्रित शोधक दिलीप रेडकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिनगारे, डॉ. मेहंदळे, डॉ. आवळे, आधीपारिचारिका सावंत, देसाई, कदम, प्रभू, तेली, राऊत, मिलन वस्त,…

Read Full News

दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.०६-: येथील नट वाचनालयचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री मडकईकर यांनी एकापेक्षा एक सरस मालवणी कविता सादर करत उपस्थितांची जाग्यावर खिळवून ठेवले.जि.प. केंद्रशाळा नं. १ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे…

Read Full News

एस आर एम कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथीसह अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…

⚡कुडाळ ता.०६-: संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि वाङ्मचर्चा चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पोस्टर प्रदर्शन…

Read Full News

मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन गवंडळकर याचा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कॅरममध्ये प्रथम क्रमांक…

⚡मालवण,ता.०६-:कट्टा येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचा विद्यार्थी आर्यन राजेंद्रगवंडळकर याने 19 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम खेळात प्रथम क्रमांक पटकाविला या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य एच बी तिवले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी आर्यनचे अभिनंदन केले आहे

Read Full News

मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे यश…!

⚡मालवण ता.०६-: क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा वराडकर हायस्कूल कट्टा मालवण या ठिकाणी संपन्न झाल्या .या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेने सुयश मिळवले आहे.

Read Full News

मालवणात माजी सैनिक विश्रामगृहावर चिंचेचे झाड कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.०६-:मालवणात आज कोसळलेल्या मुसळधार पावसात मालवण बांगीवाडा येथील माजी सैनिक शासकीय विश्रामगृहावर बाजूच्या जागेतील भलेमोठे चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली. यावेळी विश्रामगृहात कार्यरत असणारे कर्मचारी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत विश्रामगृहाच्या इमारतीचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवणात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असताना मालवण बांगीवाडा परिसरात असलेल्या माजी सैनिक शासकीय विश्रामगृहाच्या…

Read Full News

मालवणात नारळ लढविणे रील्स स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता मालवण प्रवासी टर्मिनल नवीन बंदर जेटी येथे नारळ लढविणे रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली. नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित…

Read Full News

आस्था ग्रुपतर्फे देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा…

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील आस्था ग्रुप आणि कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. १३ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता रेवतळे प्राथमिक शाळा, मालवण येथे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १० वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. प्रथम विजेत्या तीन क्रमांकाना अनुक्रमे ३००१, २००१ आणि १००१ रुपये, चषक आणि प्रमाणपत्रे…

Read Full News

कुडाळ बस स्थानकाची समितीकडून पाहणी….

स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत झाली पाहणी.. कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत चार सदस्यीय समिती मार्फत मंगळवारी ‘अ’ वर्गातील कुडाळ बसस्थानकाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने बस स्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छतेसह विविध व्यवस्थापनाची प्रत्यक्ष…

Read Full News

बॉक्सिंग क्रीडा प्रकारात बांद्याची प्रेरणा भोसले हिने सुवर्णपदक पटकवले…!

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: येथे सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा प्रकारात बांद्याच्या कुमारी प्रेरणा जय भोसले हिने सुवर्णपदक पटकवले.या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते.क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या या स्पर्धेत कणकवली,सावंतवाडी,आंबोली,मळगाव,बांदा येथील बॉक्सिंग क्रिडापटू सहभागी झाले होते.कु.प्रेरणा हिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.तिला प्रशिक्षक किरण देसाई यांचं प्रशिक्षण लाभलं.पत्रकार जय भोसले यांची ती…

Read Full News

You cannot copy content of this page