⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: येथे सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा प्रकारात बांद्याच्या कुमारी प्रेरणा जय भोसले हिने सुवर्णपदक पटकवले.या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते.
क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या या स्पर्धेत कणकवली,सावंतवाडी,आंबोली,मळगाव,बांदा येथील बॉक्सिंग क्रिडापटू सहभागी झाले होते.कु.प्रेरणा हिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.तिला प्रशिक्षक किरण देसाई यांचं प्रशिक्षण लाभलं.पत्रकार जय भोसले यांची ती सुकन्या आहे.ती बांद्याच्या खेमराज मध्ये इयत्ता बारावीत शिकत आहे.तिच्या या यशाबद्दल बांद्यातूनही तिचे अभिनंदन होत आहे.
बॉक्सिंग क्रीडा प्रकारात बांद्याची प्रेरणा भोसले हिने सुवर्णपदक पटकवले…!
