⚡मालवण ता.०६-:
मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता मालवण प्रवासी टर्मिनल नवीन बंदर जेटी येथे नारळ लढविणे रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली.
नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित व स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, कोकण वाईल्ड रेस्क्युअर सिंधुदुर्ग, सेवते प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे होणार आहे. गेली १० वर्षे आयोजित होणाऱ्या या भव्य दिव्य स्पर्धेचे यावर्षी अकरावे वर्ष आहे या निमित्ताने नारळ लढविणे रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ८००० रुपये,, ५००० रुपये, ३००० रुपये, आकर्षक चषक दिला जाणार आहे. तीन उत्तेजनार्थ क्रमांकांना आकर्षक भेटवस्तू व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
नारळ लढविणे स्पर्धेतील सर्व क्षण व्हिडीओ मध्ये असणे आवश्यक आहे, स्पर्धकांनी केलेला व्हिडिओ हा ९० सेकंदाचा असावा, व्हिडीओ शूट करताना आणि अपलोड करताना तो हॉरिझॉन्टल पद्धतीचा असावा, स्पर्धेतील व्हिडीओ १० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपलोड करून shilpayatinkhot_official या इंस्टाग्राम पेेजला कोलॅब्रेशन करणे बंधनकारक आहे. पेजला फॉलो करून कोलॅब्रेशन टाकलेली एन्ट्री ग्राह्य धरली जाणार आहे. स्पर्धेचे परीक्षण व्हिडीओचा तांत्रिक दर्जा, सुबक एडिटिंग आणि क्रिएटिव्हपणा यावरून केले जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९४२२५८४६४१, ९११२२४६१८३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
