Headlines

महावितरण विभागाच्या भोंगाळ कारभारा विरोधात रुपेश राऊळ आक्रमक…

मळेवाडा सबस्टेशनला उद्या सत्यनारायण पूजेसह महाआरती करून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडणार: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जागेची केली आज पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: महावितरण विभागाच्या भोंगाळ कारभारा विरोधात माळेवाडा सबस्टेशनला उद्या रुपेश राऊळ सत्यनारायण पूजेसह महाआरती करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा ठरवलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मळेवाड येथील सबस्टेशनला भेट देत जागेची केली पाहणी. दरम्यान उद्या सायंकाळी चार…

Read Full News

महिला शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखीसह आभार पत्र..

आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन.. ⚡कुडाळ ता.०९-: लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले. तसेच आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले.कुडाळ येथील महायुतीच्या संपर्क कार्यालयात महिला शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री…

Read Full News

कुडाळ रोटरीकडून चेंदवण हायस्कूलला वाॅटर प्युरिफायर…

माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांचा पुढाकार.. कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वाॅटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. यासाठी माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने,माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, दिनेश…

Read Full News

चेंदवण-कवठी गावात फळझाड रोपांचे वितरण…

इनरव्हील क्लब कुडाळ आणि सौ. रेश्मा नाईक यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०९-: इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून चेंदवण कवठी गावातील ३०० महिलांना ६०० फळझाडे रोपांचे वितरण करण्यात आले. चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ…

Read Full News

कवठी-चेंदवण मध्ये अवैध वाळू उत्खननावर कारवाई…

महसूल विभागाने रॅम्प उध्वस्त केले.. ⚡कुडाळ ता.०९-: तालुक्यातील कवठी व चेंदवण परिसरात कर्ली नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत चेंदवण येथील वाळूचे सहा रॅम्प तर कवठी येथील दोन वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले.हि कारवाई उपविभागीयअधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी…

Read Full News

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगराध्यक्षांकडून कामांची पाहणी…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली पाहणी.. ⚡कुडाळ ता.०९:- गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून या कामांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.कुडाळ नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू केली आहेत. ही कामे गणेश घाटापासून सुरू केली आहेत. यामध्ये गणेश…

Read Full News

भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य यशस्वी करा…

विजय पांचाळ:संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये एसीबीचा जनजागृती कार्यक्रम.. कुडाळ : भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करा, असा संदेश सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्री.विजय पांचाळ यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला. कोणी लाच मागत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करा असे आवाहन त्यानी यावेळी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे उद्या नारळ लढविणे स्पर्धा…

रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत.. ⚡कुडाळ ता.०९-: रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर येथे भव्य दिव्य अशी नारळ लढवणे स्पर्धा रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे सायंकाळी ठीक चार वाजता आयोजित केली आहे.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५००१/- रुपये तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३००१/- रुपये उद्योजक रुपेश…

Read Full News

बाउंसर-आंदोलक मारामारी प्रकरणी सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आवारात 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बाऊन्सर आणि आंदोलक यांच्यातील हाणामारी प्रकरणी ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सर्व आठही संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. परिमल नाईक आणि ॲड. सुनील लोट यांनी काम पाहिले.

Read Full News

भाजप कुडाळ मंडलची जम्बो कार्यकारिणी जाहीर…

महिला उपाध्यक्षपद प्रवेश करणाऱ्या महिलेसाठी राखीव:कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची पत्रकार परिषद.. कुडाळ : भारतीय जनता पार्टीची कुडाळ मंडल कार्यकारिणी आज अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत एकूण ७० सदस्य असून. सगळ्या आघाड्याची मिळून ३०० सदस्यांची कार्यकारीणी होणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या महिलेसाठी महिला उपाध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आले आहे. तर कुडाळ शहर…

Read Full News

You cannot copy content of this page