खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ…

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री ७:३० वा. या नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून विलास जामसंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विठ्ठल देसाई, शहराध्यक्ष आण्णा कोदे, संतोष चव्हाण, समीर प्रभुगावकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अभि मुसळे, स्वप्नील चिंदरकर, पंढरी वायंगणकर, आनंद पारकर, महेश गुरव, संदीप सावंत आदी उपस्थित होते. यावेळी दशावतार नाट्य प्रेमींनी नाट्य महोत्सवासाठी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page