Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ड्रोनद्वारे जमिनींचे सर्वेक्षण…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती: आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातही नगरपरिषद हद्दींचा ड्रोन सर्वे करून प्रत्येकाच्या भुखंडाला नकशा स्कीम मधून ‘ स्वामित्व सनद ‘ देण्यात येईल. ग्रामीण भागातही याच पद्धतीने सर्व भूखंडांना स्वामित्व सनद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार…

Read Full News

सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्रीना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे स्वागत स्वीकारले.या वेळी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत पक्षाच्या…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ…

सिंधुदुर्गनगरी ता.१३ :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. या ध्वजारोहणानंतर सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य…

Read Full News

मळगावात १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मळगाव ग्रामस्थ व भिलवाडी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दुपारी सायं. ३ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून, विजेत्या पथकाला ११,१११ रुपये रोख पारितोषिक व आकर्षक बक्षिसे…

Read Full News

जिल्ह्यातील जमिनींचा प्रश्न सोडविण्यासाठी खास अभियान राबविणार…

महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती.. ओरोस ता १३सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनींचा सामाईक सातबारा हा प्रश्न जटिल आहे. त्यामुळे कोकणातील शासकीय अथवा खाजगी जमिनींची पुन्हा मोजणी करणे काळाची गरज बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यासाठी खास अभियान राबविण्यात येणार आहे. यामधून आकारीपड, देवस्थान इनाम, वनसंज्ञा, कबुलायातदार यांसह अन्य शासकीय जमिनींचा प्रश्न सोडविला जाणार आहे, अशी माहिती…

Read Full News

जिल्ह्यात ४० वाळू माफिया…

एम पी डी ए अंतर्गत कारवाई करणार:महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती.. ओरोस ता १३अधिकारी आणि वाळू माफिया यांच्यातील कनेक्शन जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत वाळू चोरी थांबणार नाही. ही वाळू चोरी थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक (एम पी डी ए) हा कडक कायदा केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी अधिकारी करीत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० व्यक्ती…

Read Full News

उबाठा शिवसेनेच्या वतीने मुंबई-गोवा हायवेवर चक्का जाम आंदोलन…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात:आमचे आंदोलन शांततेत, हायवे दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन तीव्र,माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज सकाळी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसानी माजी आमदार वैभव…

Read Full News

गणेशोत्सव काळात कुडाळात मुख्य रस्ता मोकळा राहणार…

नगर पंचायतने केले गणेशोत्सव काळातील नियोजन:वनवे, पार्किंग, एसटी मार्गाचे नियोजन.. ⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ नगरपंचायत कार्यालयामार्फत गणेश चतुर्थी सणानिमित्त बाजार व वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे.याबाबत नगर पंचायतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,१) गणेश चतुर्थीच्या कालावधीत कुडाळ नगरपंचयतीच्या मालकीचा रस्ता हा पुर्णपणे मोकळा रहील. (हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एस.टी. डेपो पर्यंत)२) दिनांक 27 ऑगस्ट, 2025…

Read Full News

महावितरणच्या जीवघेण्याकेबल विरोधात तेंडोली ग्रामस्थ आक्रमक…

⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यात तेंडोली गावात महावितरणचे केबल घालण्याचे काम चालू असून ते चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे अभियंता कुलकर्णी यांनी आज महावितरण इन्फ्राचे इंजिनिअर तिडके यांना तेंडोली येथे पाठवले. तिडके यांनी स्वतः जाग्यावर जात पाहणी केली असता केबल १ ते १.५ फुटावर जमिनीत असल्याचे निदर्शनास…

Read Full News

कुडाळ करमळगाळू येथे कार अपघातात तरुणाचा मृत्यू…

कुडाळ : कुडाळ-पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी-करमळगाळू येथील एसटी बस थांब्या नजीक कुडाळहून परुळेच्या दिशेने जाणाऱ्या एका इर्टिगा कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे.कार आपली दिशा सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गटारात जात घळणीला घासत निसाला धडक देत पलटी झाली. कारने तीन कोलंट्या घेतल्या असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.ही धडक एवढी जबरदस्त होती की…

Read Full News

You cannot copy content of this page