जिल्ह्यात ४० वाळू माफिया…

एम पी डी ए अंतर्गत कारवाई करणार:महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती..

ओरोस ता १३
अधिकारी आणि वाळू माफिया यांच्यातील कनेक्शन जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत वाळू चोरी थांबणार नाही. ही वाळू चोरी थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक (एम पी डी ए) हा कडक कायदा केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी अधिकारी करीत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० व्यक्ती वाळू माफिया म्हणून निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या सर्व व्यक्तींवर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा अंतर्गत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करावी, अशा सूचना आपण दिल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आ दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई यांच्यासह भाजप पदाधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page