नगर पंचायतने केले गणेशोत्सव काळातील नियोजन:वनवे, पार्किंग, एसटी मार्गाचे नियोजन..
⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ नगरपंचायत कार्यालयामार्फत गणेश चतुर्थी सणानिमित्त बाजार व वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत नगर पंचायतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,
१) गणेश चतुर्थीच्या कालावधीत कुडाळ नगरपंचयतीच्या मालकीचा रस्ता हा पुर्णपणे मोकळा रहील. (हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एस.टी. डेपो पर्यंत)
२) दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी पासून होणाऱ्या गणेश चतुर्थी सणा निमित्त दिनांक 25/08/2025 ते दिनांक 08/09/2025 रोजीपर्यंत किरकोळ पथविक्रेत्यांना तसेच बुधवार बाजार धरुन व्यापाऱ्यांना हॉटेल अभिमन्यु ते गुलमोहर हॉटेलपर्यंत व्यापार करणेस सक्त मनाई राहील.
३) कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये केवळ गणेश माटी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दिनांक 25/08/2025 व दिनांक 26/08/2025 रोजी इतर ठिकाणी व्यापार करणेस परवानगी देण्यात आली आहे.
४) नार्वेकर बेकरी ते भाट बिल्डींग तसेच नगरपंचायत मालकीचे पटांगण व भाजीमार्केट या ठिकाणी व्यापाऱ्यांना व्यापार करणेस परवानगी आहे.
५) अनंत मुक्ताई हॉटेल समोरील मोकळ्या जागेमध्ये तसेच कोर्टाकडील मोकळया जागेमध्ये चार चाकी वाहनांना पार्किंग व्यवस्था व जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन चाकी वाहनास पार्किंग व्यवस्था निश्चित करुन देण्यात आली आहे.
६) पुष्पा हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत या रस्त्यावर दुकानाच्या पुढे वाहन पार्किंग करत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सदर ठिकाणी नो-पार्किंग करण्यात आले आहे.
७) सकाळी 9.00 ते रात्री. 8.00 पर्यंत अवजड वाहनांना व चार चाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेमध्ये येण्यास सक्त मनाई राहील.
९) सदरच्या कालावधीमध्ये पोलीस खात्यातील कर्मचारी हे सतत कार्यरत राहतील.
९) आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणेत येणार आहे.
१०) तक्रार निवारणासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यालयामध्ये आपत्ती कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
११) सर्व गणेश घाटावरील रस्ते व त्याबाबतचे व्यवस्थापन बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे तसेच विद्युत पुरवठा रोषणाईची कामे विद्युत विभागामार्फत करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व गणेश घाटावर साफसफाई व निर्माल्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
१२) गणेश चतुर्थी उत्सवाच्या कालावधीत दिनांक 24/08/2025 रोजी दुपारी 2.00 वाजले पासून दिनांक 06/09/2025 रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत कुडाळ पोलिस स्टेशन व नगरपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीच्या ठरावानुसार डेपो जवळील बसस्थानकावरुन जुन्या बसस्थानकावर जाणाऱ्या तसेच आगारातून जुन्या बसस्थानकावर जाणाऱ्या सर्व रा.प. बसेस ह्या आर.एस.एन हॉटेल- एस.आर.एम. कॉलेज- पोलीस स्टेशन- पोस्ट ऑफीस – जुने बसस्थानक हया मार्गे एकेरी मार्गाचा वापर करतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी.
१३) कणकवली पणदूर मार्गावरुन येणाऱ्या बसेस सरळ आर.एस.एन हॉटेल कॉलेज चौक पोलिस स्टेशनमार्गे कुडाळ शहर बसस्थानकमध्ये नोंद करतील व सावंतवाडी / वेंगुर्ला / मालवण / पणजी / कवठीकडे रवाना होणाऱ्या बसेस कुडाळ शहर बस स्थानकात नोंद करुन पंचायत समिती काळापनाका नवीन बसस्थानक आर.एस. एन हॉटेल मार्गे पुढे मार्गस्थ होतील. याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
