Headlines

चौकचार मित्रमंडळातर्फे शंकर मंदिर महिला मंडळाला साड्यांचे वाटप…!

⚡मालवण ता.२३-:मालवण मेढा येथील शंकर मंदिर महिला मंडळाच्या वतीने रंगमेळा हा सांस्कृतिक कार्यक्रम विविध ठिकाणी सादर होत असून या कार्यक्रमासाठी मंडळातील महिलांना मेढा येथील चौकचार मित्रमंडळाच्या वतीने नऊवारी साड्यांचे वाटप करण्यात आले. मेढा येथील श्री चौकचार मांड येथे साडी वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चौकचार मित्रमंडळाचे यशवंत मेथर, बाळू तारी, आप्पा मोरजकर, विनायक मोरजकर, अभय…

Read Full News

कातवड येथील भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सव…!

⚡मालवण ता.२३-:मालवण तालुक्यातील कातवड येथील नलावडे परिवाराच्या कुलस्वामिनी श्री देवी भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सव साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रोज भजन कार्यक्रम, सायंकाळी आरती, रात्री गरबा नृत्य होणार आहे. तर दि. २८ सप्टेंबर रोजी होमहवन, महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, भजन कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read Full News

झाराप मध्ये एका रात्रीत चार ठिकाणी चोरी ; किरकोळ रोकड चोरीला…

कुडाळ : झाराप येथील महामार्गावरचे एटीएम फोडण्याचा फासलेला प्रयत्न ताजा असतानाच सोमवारी मध्यरात्री झाराप मध्ये चार ठिकाणी चोरी झाली. या घटनेमुळे झाराप गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.झाराप मध्ये बैंकऑफ इंडिया समोर असणारे सत्यवान कुडाळकर आणि चंद्रकांत हरमलकर यांचे वडापावचे स्टॉल तसेच झाराप तिठा येथील हेमंत फणसेकर यांचे गैरेज, संदीप दळवी…

Read Full News

‘एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास…

ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट:मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली.. सिंधुदुर्गनगरी दि. २३ (जिमाका) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intelligence) आधारित मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास…

Read Full News

युवा उद्योजक मंदार महाजन यानी बांदा साईमठास ध्वनीक्षेपक केला प्रदान…

⚡बांदा ता.२३-: बांदा येथे धार्मिक व सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या श्री साई मठास नवे ध्वनीक्षेपक यंत्र प्रदान करून युवा उद्योजक मंदार महाजन यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला.मठातील विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच सण-उत्सवाच्या वेळी उत्तम ध्वनीव्यवस्था उपलब्ध व्हावी या हेतूने हे ध्वनीक्षेपक देण्यात आले. या कार्यामुळे भाविकांना अध्यात्मिक वातावरणाचा लाभ होणार असून कार्यक्रम अधिक…

Read Full News

ओबीसी समाजाचे कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलन…

नागपूर येथील प्रस्तावित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन:जिल्ह्यातले विविध ३२ ओबीसी समाज आंदोलनात सहभागी.. ⚡कुडाळ ता.२३-: ओबीसी समाजाच्या नागपूर येथे २८ तारखेला निघणाऱ्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या वतीने आज कुडाळ येथे लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलनांला सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या लाक्षणिक आंदोलनाची सुरुवात कुडाळ येथील राजमाता जिजाऊंच्या…

Read Full News

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश…!

⚡सावंतवाडी ता.२३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन ओरोस येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या 14 वर्षाखालील मुलांच्या गटातून सुशोधन सावंत याने प्रथम क्रमांक, मानस सावंत यांनी चतुर्थ क्रमांक व 17 वर्षाखालील मुलींच्या…

Read Full News

तळवडे शाळा नं.९ मध्ये मोफत वह्यांचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२३-: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप सारखा एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आंबोली मंडल अध्यक्ष संदिप गावडे यांच्या सहकार्याने व मिलिटरी रिटायर प्रवीण लोके तसेच सुधीर लोके यांच्या पुढाकाराने तळवडे गावातील जिल्हा परिषद शाळा नं.९ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन…

Read Full News

बाळकृष्ण पेडणेकर मुंबई येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत विजयी…

⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचा सावंतवाडीतील राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने चेंबूर, मुंबई येथे झालेल्या दुस-या चेंबूर जिमखाना राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळवला. देशभरातील पाचशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाळकृष्णने उत्कृष्ट खेळ करत नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून, दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून सात गुण केले.जगभरात प्रसिदध…

Read Full News

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी २५ सप्टेंबरला धरणे आंदोलन…

⚡ओरोस ता २३-: जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या ४४३ शिक्षकांना कार्यमुक्त करावे यांसह विविध १४ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती २५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते ६ या वेळेत लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहे.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. संघटनेच्या शिष्टमंडळास शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडे…

Read Full News

You cannot copy content of this page