कातवड येथील भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सव…!

⚡मालवण ता.२३-:
मालवण तालुक्यातील कातवड येथील नलावडे परिवाराच्या कुलस्वामिनी श्री देवी भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सव साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रोज भजन कार्यक्रम, सायंकाळी आरती, रात्री गरबा नृत्य होणार आहे. तर दि. २८ सप्टेंबर रोजी होमहवन, महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, भजन कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page