⚡मालवण ता.२३-:
मालवण मेढा येथील शंकर मंदिर महिला मंडळाच्या वतीने रंगमेळा हा सांस्कृतिक कार्यक्रम विविध ठिकाणी सादर होत असून या कार्यक्रमासाठी मंडळातील महिलांना मेढा येथील चौकचार मित्रमंडळाच्या वतीने नऊवारी साड्यांचे वाटप करण्यात आले.
मेढा येथील श्री चौकचार मांड येथे साडी वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चौकचार मित्रमंडळाचे यशवंत मेथर, बाळू तारी, आप्पा मोरजकर, विनायक मोरजकर, अभय कदम, लक्ष्मण प्रभू, भूषण मेतर, महिला मंडळाच्या मार्गदर्शक शुभदा टिकम व महिला सदस्या आदी उपस्थित होते. या सहकार्याबद्दल महिला मंडळाकडून चौकचार मित्रमंडळाचे आभार मानण्यात आले.
