⚡मालवण ता.२३-:
देवी भगवती मंदिर, धामापूर येथे देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सोमवार, २२ पासून नवरात्र उत्सव कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गुरुवार, २ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे.
यानिमित्त दररोज स्थानिक भजने होणार आहेत. मंगळवार, २३ रोजी श्रीकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ यांचे भजन, बुधवार, २४ रोजी ब्राह्मणदेव भजन मंडळ, पिंगुळी, गुरुवार, २५ रोजी श्री घुमडाई प्रासादिक मंडळ, घुमडे, शुक्रवार, २६ रोजी श्री सद्गुरु भजन मंडळ, कुडाळ, शनिवार, २७ रोजी
श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, काळसे, रविवार, २८ रोजी श्री भावईदेवी महिला प्रासादिक भजन मंडळ, गोठोस, सोमवार, २९ रोजी दुर्वांकुर भजन सेवा मंडळ, काळसे मंगळवार, ३० रोजी स्थानिक भजने होतील. बुधवार, १ ऑ क्टोबर रोजी अश्विन शुद्ध नवमीला नवरात्रोत्थापन व देवतांना प्रसाद अर्पण, रात्री १० वाजता भगवती मंदिरात पुराणकथा वाचन होईल. २ रोजी भजने, दशमी दिवशी देवीची विशेष पूजा, संध्याकाळी पालखी सोहळा व सीमोल्लंघन सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन देवी भगवती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, धामापूर विश्वस्त साईनाथ देसाई यांनी केले आहे.
भगवती मंदिर धमापूर येथे नवरात्रौत्सवाची धूम…!
