झाराप मध्ये एका रात्रीत चार ठिकाणी चोरी ; किरकोळ रोकड चोरीला…

कुडाळ : झाराप येथील महामार्गावरचे एटीएम फोडण्याचा फासलेला प्रयत्न ताजा असतानाच सोमवारी मध्यरात्री झाराप मध्ये चार ठिकाणी चोरी झाली. या घटनेमुळे झाराप गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
झाराप मध्ये बैंकऑफ इंडिया समोर असणारे सत्यवान कुडाळकर आणि चंद्रकांत हरमलकर यांचे वडापावचे स्टॉल तसेच झाराप तिठा येथील हेमंत फणसेकर यांचे गैरेज, संदीप दळवी यांचे चिकन सेंटर चोरट्यानी फोडून दुकानातील किरकोळ रोकड़ चोरल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. दोन दिवसांपूर्वीच एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोर पोलिसांच्या हाती लागले असताना अशा प्रकारे पुन्हा चोरीची घटना घडल्याने झाराप परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान झाराप परिसरातील सीसीटीवी गेले कित्येक दिवस बंद आहेत हे सुरु करण्याची देखील मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

You cannot copy content of this page