⚡सावंतवाडी ता.२३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन ओरोस येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या 14 वर्षाखालील मुलांच्या गटातून सुशोधन सावंत याने प्रथम क्रमांक, मानस सावंत यांनी चतुर्थ क्रमांक व 17 वर्षाखालील मुलींच्या गटातून आलिया दर्गावाले हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे निवड विभागीय स्तरासाठी झालेली आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री हितेश मालणकर व श्रीम. शेरॉन अल्फांसो यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना,पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
