⚡बांदा ता.२३-: बांदा येथे धार्मिक व सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या श्री साई मठास नवे ध्वनीक्षेपक यंत्र प्रदान करून युवा उद्योजक मंदार महाजन यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला.
मठातील विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच सण-उत्सवाच्या वेळी उत्तम ध्वनीव्यवस्था उपलब्ध व्हावी या हेतूने हे ध्वनीक्षेपक देण्यात आले. या कार्यामुळे भाविकांना अध्यात्मिक वातावरणाचा लाभ होणार असून कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पार पाडले जातील.
या सामाजिक कार्याबद्दल मठ व्यवस्थापन समीतीच्या वतीने उपस्थित भक्तगणांनी मंदार महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजासाठी तरुण पिढी पुढे येत असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
धर्मकार्याशी एकनिष्ठ राहून समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा असल्याचे मत या प्रसंगी श्री महाजन यानी यावेळी व्यक्त केले.
यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, खजीनदार राजेश कारेकर, उद्योजक सिध्देश पावसकर, वास्तूविशारद संतोष सावंत आदी उपस्थित होते. राजेश कारेकर यानी आभार मानले.
फोटो:-
बांदा येथे साई मठास ध्वनीक्षेपक प्रदान करताना युवा उद्योजक मंदार महाजन. सोबत राकेश केसरकर व इतर.
युवा उद्योजक मंदार महाजन यानी बांदा साईमठास ध्वनीक्षेपक केला प्रदान…
