Headlines

इन्सुलीत ओंकार हत्तीचा थाट, बांदा–सावंतवाडी मार्गावर वाहतूक ठप्प…

⚡बांदा ता.२६-: काल सायंकाळी उशिरा इन्सुली गावात दाखल झालेल्या ओंकार हत्तीने आज सकाळीच बांदा सावंतवाडी मार्ग रोखून धरला. आज सकाळी इन्सुली चर्चजवळ त्याने ठिय्या मांडल्याने रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूकडून थांबवून ठेवण्यात आली. ओंकार हत्तीने काल सायंकाळी मुंबई गोवा महामार्ग ओलांडत इन्सुली गावात प्रवेश केला होता. रात्रभर त्याचा वावर इन्सुलीतील सावंतटेम्ब व कुडवटेम्ब परिसरात होता. आज…

Read Full News

ओंकार” हत्तीची महामार्गावर हजेरी…

नागरिकांची गर्दी:वनविभाग सतर्क.. बांदा,ता.२५: कास-मडुरा भागात गेले काही दिवस स्थिरावलेल्या “ओंकार” हत्तीने आज चक्क मुंबई-गोवा महामार्गावर हजेरी लावली. थेट रस्त्यावर हत्ती दिसल्यामुळे अनेकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी करुन आपल्या कॅमेर्‍यात फोटो कैद केले. दरम्यान त्या ठिकाणी काही वेळ थांबून तो आता इन्सुली भागात स्थिरावला आहे. पुन्हा तो महामार्गावर येवू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,…

Read Full News

बांद्यात उबाठा सेनेला संजू परबांनी दिला धक्का…

युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश.. ⚡बांदा ता.२५-: शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचे दिवाळीनंतरही पक्षप्रवेशांचे धमाक्यांवर धमाके सुरूच आहेत. आज सायंकाळी बांदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतील युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्धव शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे…

Read Full News

विशाल परबांनी शहराच्या भानगडीत पडू नये…

संजू परब यांचा थेट इशारा: दीड तासात संजू परबांनी काढली विशाल परबांची हवा, प्रवेश करते माघारी परतले.. ⚡सावंतवाडी, ता.२५-: विशाल परबांनी शहराच्या भानगडीत पडू नये, अन्यथा तुमची कारणामे बाहेर काढीन,” असा थेट इशारा संजू परब यांनी आज येथे दिला. संजू परब म्हणाले, “विशाल परबांची काय हवा आहे ती मी दीड तासात काढून दाखवली. त्यामुळे त्यांनी…

Read Full News

डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात उद्या पासून अखंड हरिनाम सप्ताह…

⚡मालवण ता.२५-:जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ पासून सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे या सप्ताहाची सांगता दि २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री च्या दर्शनाचा तसेच हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ मंदिर,…

Read Full News

पिंगुळी – शेटकरवाडी येथील गड-किल्ले बनविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील किल्ले गड बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमुकल्या बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र राज्यातील बनवलेले गड, किल्ले हे लक्षवेधी ठरले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गड किल्ले स्पर्धेत १७ जणांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला    श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय शेटकरवाडी पिंगुळी यांच्या वतीने यावर्षी प्रथमच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राजे छत्रपती…

Read Full News

येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार…

आमदार निलेश राणे:वेताळबांबर्डे येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा.. ⚡कुडाळ ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांने आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले. पावशी विभागाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या मेळाव्याला शिवसेना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला तर या मेळाव्यामध्ये अणाव व…

Read Full News

इन्सुली सहकारी दुग्ध संस्थेकडून दुग्ध उत्पादकांना ५ लाख २९ हजारांचा बोनस वाटप..!

⚡बांदा ता.२५-: इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेचा सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील दुग्ध उत्पादकांना बोनस वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर होते. यावेळी जगन्नाथ झाट्ये, सचिव संजय सावंत, संचालक सखाराम बागवे, विलास गावडे, गीतांजली हळदणकर, सुहानी गावडे, सुधीर गावडे, जगन्नाथ नाटेकर,…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात स्वावलंबी भारत अभियानाच्या समन्वयकपदी बाबा काणेकर यांची निवड …

बांदा/प्रतिनिधीस्वावलंबी भारत अभियानाच्या सावंतवाडी तालुका समन्वयकपदी भाजपचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत असून, स्थानिक उद्योग, उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या निवडीकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.स्वावलंबी भारत अभियानाचा उद्देश देशाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा…

Read Full News

गावचा विकास होण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही…

पालकमंत्री राणे: भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न… ⚡वेंगुर्ला ता.२५-: येणा-या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरांमध्ये कमळ फुलले पाहिजे. ज्या पक्षाचे आमदार नाहीत, खासदार नाहीत त्या पक्षात राहून आपल्या भागाचा विकास कसा होणार हे ओळखल्याने या दोन सरपंचांनी भाजपामध्ये पवेश केला आहे. आम्ही कोणावर टिका टिप्पणी करण्यासाठी किवा कुठल्याही पक्षाची ताकद कमी करण्यासाठी मेळावे घेत नाही…

Read Full News

You cannot copy content of this page