पालकमंत्री राणे: भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न…
⚡वेंगुर्ला ता.२५-: येणा-या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरांमध्ये कमळ फुलले पाहिजे. ज्या पक्षाचे आमदार नाहीत, खासदार नाहीत त्या पक्षात राहून आपल्या भागाचा विकास कसा होणार हे ओळखल्याने या दोन सरपंचांनी भाजपामध्ये पवेश केला आहे. आम्ही कोणावर टिका टिप्पणी करण्यासाठी किवा कुठल्याही पक्षाची ताकद कमी करण्यासाठी मेळावे घेत नाही तर आमची ताकद वाढविण्यासाठी घेत आहोत. तुमच्या गावाचा जर विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. तुम्ही आमचा जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून दिलात तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला भरभरून देण्याची जबाबदारी ही माझी असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांना दिले
तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघात उद्धव सेनेला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी खिंडार पाडले आहे. उद्धव सेनेचे वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर यांच्यासहित पदाधिका-यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात वेंगुर्ला भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात हे पक्ष प्रवेश संपन्न झाले. यावेळी वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवि दुतोंडकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण उर्फ पपन बंदवलकर, दाभोली ग्रा.पं.सदस्य जया पवार, अर्चना दाभोलकर यांच्यासहित शाखाप्रमुख बाबा पेडणेकर, उपशाखाप्रमुख नैनेश करंगूटकर, महिला शाखा संघटिका सारिका हळदणकर, शाखाप्रमुख प्रकाश सागवेकर, अमित दाभोलकर, स्नेहा बोवलेकर, समिधा बांदवलकर, दादा हळदणकर, दाभोली सोसायटी संचालक श्रीकांत चेंदवणकर, कार्यकर्ते गौतम दाभोलकर, चित्रा माडकर, शुभदा डिचोलकर, भूषण प्रभुखानोलकर, वायंगणी ग्रा.पं. सदस्य छाया नांदोस्कर, विद्या कांबळी यांच्यासहित वायंगणी विभाग प्रमुख आनंद दाभोलकर, उपशाखाप्रमुख अमित कामत, युवासेना विभाग प्रमुख हर्षल सातर्डेकर, आकांशा दाभोलकर, सुनील सावंत, महिला पदाधिकारी अश्विनी सावंत, विनायक कामत, करण कांबळी, आशुतोष दाभोलकर, तुषार पेडणेकर, खानोली ग्रा.पं.सदस्य अमिता खानोलकर, सागर रांजणकर यांच्यासहित अंजली मयेकर, संजय खवणेकर, दिलीप आरेकर, तारक हळदणकर, संजय घारे, अनिल हळदणकर, अश्विनी हळदणकर, पूनम नांदोसकर, मठ ग्रा.पं. सदस्य समीर मठकर, प्रथमेश मठकर, मंदार मठकर, राकेश मठकर आदींनी भाजप पक्षात प्रवेश केला.
जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री यांना खंबीर बनविण्यासाठी आम्ही चांगले रिझल्ट देणार असल्याची ग्वाही मनिष दळवी यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश जामदार तर आभार प्रदर्शन करताना साईप्रसाद नाईक यांनी आडेली जि.प.मतदार संघातून ४ हजार मताधिक्य देण्याचा शब्द पालकमंत्री यांना दिला.
जिल्हापरिषद निवडणुकीसाठी आडेली मतदारसंघातून मनिष दळवी यांना उमेदवारी दिल्यास ती फायद्याची होईल, अशी मागणी ब-याच कार्यकर्त्यांनी आपल्याकडे केली आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उबाठाच्या सरपंचांनी भाजपात पवेश केला आहे. हा त्यांचा विश्वास निश्चित सार्थकी लागणार असल्याचे पपू परब यांनी सांगितले.
फोटोओळी – वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात वेंगुर्ला भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले.
