संजू परब यांचा थेट इशारा: दीड तासात संजू परबांनी काढली विशाल परबांची हवा, प्रवेश करते माघारी परतले..
⚡सावंतवाडी, ता.२५-: विशाल परबांनी शहराच्या भानगडीत पडू नये, अन्यथा तुमची कारणामे बाहेर काढीन,” असा थेट इशारा संजू परब यांनी आज येथे दिला.
संजू परब म्हणाले, “विशाल परबांची काय हवा आहे ती मी दीड तासात काढून दाखवली. त्यामुळे त्यांनी माझ्या भानगडीत पडू नये, अन्यथा त्यांना पुन्हा माणगावचा रस्ता धरावा लागेल. जमिनीचे सातबारा बदलू शकता, पण सावंतवाडीतील जनतेचे मन बदलू शकत नाही. त्यामुळे जे कोणी विशाल परबांचे फंटर असतील, त्यांनीही सावध राहावे,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, यावेळी प्रवेश करताना बोलताना सांगितले
“आम्हाला कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावले होते; प्रवेश होणार आहे, हे सांगितले नव्हते. आमचे फोटो फसवून प्रसिद्ध करण्यात आले. आम्ही दीपक भाईंसोबतच आहोत, त्यांच्या रक्तातच आम्ही आहोत. पाटेकरच्या स्थळात आम्ही कधीही दीपक भाईंना फसवणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
