⚡मालवण ता.२५-:
जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ पासून सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे
या सप्ताहाची सांगता दि २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री च्या दर्शनाचा तसेच हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ मंदिर, डांगमोडे च्या विश्वस्त मंडळाने केले आहे
