⚡बांदा ता.२५-: इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेचा सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील दुग्ध उत्पादकांना बोनस वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर होते. यावेळी जगन्नाथ झाट्ये, सचिव संजय सावंत, संचालक सखाराम बागवे, विलास गावडे, गीतांजली हळदणकर, सुहानी गावडे, सुधीर गावडे, जगन्नाथ नाटेकर, अशोक पडवळ, शरद कोठावळे तसेच दुग्ध उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवणारे आनंद शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर म्हणाले की, “संस्थेमार्फत एकूण १९८ दुग्ध उत्पादकांना सहा टक्के बोनस वाटप करण्यात आला असून, त्याची एकूण रक्कम ५ लाख २९ हजार रुपये इतकी आहे.” तसेच संस्थेच्या वतीने दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दुग्ध उत्पादकांना शिधा भेट आणि वर्धापन दिनानिमित्त गोठ्यात उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी दुग्ध उत्पादकांना आवाहन केले की, “दुग्ध उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि आर्थिक उन्नती साधावी.”
कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन सचिव संजय सावंत यांनी केले.
फोटो:
इन्सुली सहकारी दुग्ध संस्थेचा बोनस चेक देताना सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, जगन्नाथ झाट्ये व संजय सावंत आदी मान्यवर.
इन्सुली सहकारी दुग्ध संस्थेकडून दुग्ध उत्पादकांना ५ लाख २९ हजारांचा बोनस वाटप..!
