नागरिकांची गर्दी:वनविभाग सतर्क..
बांदा,ता.२५: कास-मडुरा भागात गेले काही दिवस स्थिरावलेल्या “ओंकार” हत्तीने आज चक्क मुंबई-गोवा महामार्गावर हजेरी लावली. थेट रस्त्यावर हत्ती दिसल्यामुळे अनेकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी करुन आपल्या कॅमेर्यात फोटो कैद केले. दरम्यान त्या ठिकाणी काही वेळ थांबून तो आता इन्सुली भागात स्थिरावला आहे. पुन्हा तो महामार्गावर येवू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
