Headlines

येत्या निवडणुकीत महायुतीचा पराभव अटल…

राजू कासकर:बिल्डर लॉबीने बांधलेल्या बिल्डिंग वगळता सावंतवाडीचा असा कोणता विकास महायुतीने केला..? ⚡सावंतवाडी ता.१२-: युती होवो ना व्होवो पण येत्या निवडणुकीत महायुतीचा पराभव हा अटल आहे. बिल्डर लॉबीने बांधलेल्या बिल्डिंग वगळता सावंतवाडीचा असा कोणता विकास झाला हे दाखवा, असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी उपस्थित केला आहे. सावंतवाडीतील जनता सरकारच्या विरोधात असून येत्या निवडणुकीत…

Read Full News

सावंतवाडीत १६ रोजी मोफत महा आरोग्य शिबीराच आयोजन…

डॉ. रूत्वीज पाटणकर यांची माहिती: तर सावंतवाडीत आरजी स्टोनच्या माध्यमातून ओपीडी देखील होणार सुरु.. ⚡सावंतवाडी ता.१२-: पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या शिबिरात होणार असल्याची माहिती डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते….

Read Full News

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुलांसाठी दूध वाटप सुरू …

⚡सावंतवाडी ता.१२-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून गावातील सहा अंगणवाडीतील मुलांना दररोज दूध वाटप योजना सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ सरपंच सौ मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील लहान मुलांचे आरोग्य चांगले रहावे,कुपोषण मुक्त व्हावे आणि मुलांना सकस पौष्टिक आहार मिळावा हा हेतू मनात ठेवून हे दूध वाटप करण्यात येत असल्याचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी…

Read Full News

शरद पवार रा. काँग्रेस तर्फे वेंगुर्ले न.प. नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.१२-: पुढील महिन्यातहोऊ घातलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष ताकतीने निवडणुकीत उतरत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर करण्यात आले.त्यांच्यासह नगरसेवक पदासाठी ही 3 उमेदवारांची ही नावे जाहीर करण्यात आली असून अन्य उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करू असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाची बैठक…

Read Full News

अभय मालवणकर यांची सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.११-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी अभय मालवणकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात निवड समिती समोर ब्लॉक अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर मालवणकर यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या मुलाखतींमध्ये अभय मालवणकर यांनी प्रभावीपणे आपली बाजू मांडली. निवड समितीने त्यांच्या…

Read Full News

मालवण तालुका जय गणेश मूर्तिकार कारागीर संघटनेच्या आध्यक्षपदी समीर वर्दम यांची निवड…

⚡मालवण ता.११-:मालवण तालुक्यात प्रथमच ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर संघटना ‘ अशी मूर्तिकारांची संघटना स्थापन झाली असून तीची कार्यकारिणीही निवडण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. समीर यशवंत वर्दम यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. उमेश हडकर (हडी) व सचिवपदी श्री. संजय राधाकृष्ण केळूसकर (तारकर्ली) यांची निवड करण्यात आली यावेळी बोलताना नूतन अध्यक्षसमीर वर्दम म्हणाले…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.११-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Read Full News

तारकर्ली – देवबाग मार्गासाठी मिनी बस उपलब्ध कराव्यात…

सुरेश बापर्डेकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.११-:मालवण तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या विकसित आणि निसर्गरम्य गाव असलेल्या तारकर्ली – देवबाग येथे पर्यटकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या कोंडीमुळे मोठ्या एसटी बसला देवबागपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. परिणामी काही फेऱ्या तारकर्लीतूनच वळवाव्या लागतात किंवा अचानक बंद कराव्या लागतात. या गंभीर समस्येकडे…

Read Full News

गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला…

२३५ विरुद्ध २१० मते पडल्याने शिरोडकर यांचे सरपंच पद अबाधित.. सिंधुदुर्गनगरी ता ११ गावराई ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर उपसरपंच आणि सदस्यांनी घातलेल्या अविश्वास ठरावात जनशक्तीने (ग्रामस्थानी)सरपंच सोनल शिरोडकर यांना त्यांच्या बाजूने २३५ तर उपसरपंच संतोष सामंत आणि सदस्य यांच्या बाजूने २१०मते दिली .गावराई ग्रामसभेने सरपंच सोनल शिरोडकर यांचे सरपंच पद अबाधित ठेवले आहे, कुडाळ तालुक्यातील गावराई…

Read Full News

आम्ही भारतीय सिंधुदुर्गच्या मोर्चात सहभागींवर गुन्हे दाखल …

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याची कारवाई.. ओरोस ता ११सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना सोमवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. आम्ही भारतीय सिंधुदुर्ग यांच्यावतीने…

Read Full News

You cannot copy content of this page