⚡सावंतवाडी ता.०२-:
कारिवडे गावच्या उपसरपंचपदी श्री. महेश नारायण गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेशजी सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीय धोरणानुसार विद्यमान उपसरपंच श्री. तुकाराम बाबाजी आमुणेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.
आज ग्रामपंचायत कारिवडेच्या खास मासिक सभेत श्री. महेश नारायण गांवकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मा. श्री. महेशजी सारंग यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी कारिवडे गावच्या सरपंच सौ. आरती अशोक माळकर, श्री. अशोक रामकृष्ण माळकर (भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष), गावचे प्रमुख मानकरी श्री. बाबा गांवकर, श्री. चेतन गांवकर, माजी सरपंच श्री. लक्ष्मण सावंत, श्री. विठ्ठल परब, ज्येष्ठ ग्रामस्थ, सौ. प्राजक्ता केळुसकर (माजी पंचायत समिती सदस्या), माजी उपसरपंच श्री. तुकाराम आमुणेकर, सौ. तन्वी साइल, ग्रामपंचायत सदस्या सौ. अरुणा सावंत, सौ. प्रतिभा जाधव, श्री. शंकर मेस्त्री (तंटामुक्ती अध्यक्ष) तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री. महेश नारायण गांवकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामविकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
