मुख्य जलवाहिनीत लिकेज…

कणकवलीतील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद..

⚡कणकवली ता.०२-:
कणकवली शहरातील बांधकरवाडी टाकीवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीत लिकेज आढळून आल्याने शनिवारी, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या लिकेज दुरुस्तीच्या कामामुळे निम्मेवाडी, भालचंद्रनगर, मधलीवाडी, कांबळे गल्ली, सुतारवाडी, टेंबवाडी, फौजदारवाडी, डेगवेकर पोहे मिल परिसर, शाळा क्रमांक २ तसेच पिळणकरवाडी या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक पाणीसाठा करून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page