आजगाव गावच्या सरपंच यशश्री सौदागर यांची राष्ट्रीय स्तरावर निवड..

हैदराबाद येथे डिजिटल स्टोरी टेलिंग प्रशिक्षणासाठी निवड..

⚡सावंतवाडी ता.०२-: आजगाव गावच्या सरपंच यशश्री आनंद सौदागर यांची हैदराबाद येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था ,भारत सरकार आयोजित “डिजिटल स्टोरी टेलिंग” या विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली. कोकण विभागातून निवड झालेल्या त्या एकमेव सरपंच ठरल्या असून ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी
भूषणावह बाब मानली जात आहे.
केंद्र सरकारच्या वतीने १८ व १९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील एनआयआरडीपीआर कॅम्पस मध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ग्राम स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि शासकीय योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवणाऱ्या देशातील महिला सरपंचांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र, ओडिसा, आंध्र प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या राज्यातील कर्तुत्ववान महिला प्रतिनिधींचा समावेश होता. महाराष्ट्र मधून सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, भंडारा, यवतमाळ आणि संभाजीनगर या सहा जिल्ह्यातील सहा कर्तव्यदक्ष महिला सरपंचांची निवड झाली आहे. यामध्ये संपूर्ण कोकण विभागामधून केवळ यशश्री सौदागर यांची निवड झाल्याने त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि विकास कामांचे राष्ट्रीय स्तरावरून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page