⚡मालवण ता.०२-:
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त )कट्टा च्या १९८१-१९८२ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता ते साडे बारा वाजता या कालावधीत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त)येथे संपन्न होणार आहे.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(सं )कट्टा यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा करत असून या प्रशालेचे माजी विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी यांना संघटित करून त्यांचा स्नेह मेळावा बनवण्याचा संयुक्त उपक्रम कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि राबवलेला आहे त्यानुसार या शिक्षण संस्थेने माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत सन १९८१-१९८२ चे बॅचच्या दहावी मधील माजी विद्यार्थ्यांचा उद्या शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी कट्टा येथे एकत्रित येत आहेत या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्याचे काम होणार आहे तरी १९८१-१९८२ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वराडकर हायस्कूलच्या १९८१–८२ दहावी बॅचचे स्नेहसंमेलन उद्या…
