⚡मालवण ता.०२-:
गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत असलेल्या मालवण नगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मधील मोरेश्वरवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात या भागाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी केलेल्या ठोस प्रयत्नामुळे यश आले असून या भागात पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे
मालवण नगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मधील मोरेश्वरवाडी येथील नळपाणी योजनेची मुख्य पाईपलाईन दबल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीपुरवठा होत नव्हता. या समस्येमुळे रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
ही गंभीर बाब लक्षात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित विभागाशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नातून मोरेश्वरवाडीमध्ये जाणारी खराब झालेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन काढून त्याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली.
नवीन पाईपलाईन बसवल्यानंतर परिसरातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून, नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली पाणीटंचाई दूर झाल्याने स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे
नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत तातडीने उपाययोजना केल्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या कार्यपद्धतीचे परिसरात कौतुक होत आहे.
