Headlines

सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.१३-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या रूपाने पंचवार्षिक निवडणुकीसाठीचा हा पहिलाच अर्ज ठरला आहे‌. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, सहा‌. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण…

Read Full News

महाविकास आघाडीच संपूर्ण पॅनल नगराध्यक्षसह निवडून येईल…

विनायक राऊत:सावंतवाडीत मला ५ हजार मत मिळाल. पैसा नसल्याने थोडे कमी पडलो,तर सावंतवाडीचा विकास काही राजकीय प्रवृत्तीमुळे होऊ शकला नाही.. ⚡सावंतवाडी ता.१३-: माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सौ.सीमा मठकर यांना प्रवेश देताना आनंद होत आहे. महाविकास आघाडीच संपूर्ण पॅनल त्यांच्यासह निवडून येईल असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीत मला…

Read Full News

सीमा मठकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.१३-:सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकर यांनी अखेर माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी सीमा मठकर यांनी मशाल चिन्ह हाती घेत पक्षनिष्ठेची शपथ घेतली. कार्यक्रमाला जिल्हा व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीमा मठकर यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवूनच मी हा निर्णय…

Read Full News

महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकरच…

विनायक राऊत:नारायण राणे आणि रविंद्र चव्हाणांचे दोन गट एकमेकांच्या विरोधात.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी, वेंगुर्ला महाविकास आघाडीची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करत आहोत. सौ. मठकर यांना वारसा आहे, सामाजिक कार्याच व्रत त्यांनी घेतलं आहे. पैशाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणात त्यांनी तत्व जपलं आहे. त्यामुळे सावंतवाडीकर त्यांना आशीर्वाद देतील असा…

Read Full News

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,श्रीराम सोलर, सावंतवाडी.

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💡💡 लाईट बिल जास्त येते ? 💡💡🌠🌠 सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली? 🌠🌠🥰 काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू ! 😊 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ महाराष्ट्रात प्रथमच 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ 🌞🌞 पीएम सुर्यघर मोफत वीज योजना 🌞🌞 ☀️☀️ श्रीराम सोलर, सावंतवाडी ☀️☀️ 🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१० 👉👉आमची हमी…

Read Full News

सिंधुदुर्गात घरफोड्यांचा उलगडा…

कोल्हापूर येथील आरोपीकडून १७ गुन्ह्यांचा पर्दाफाश:कळसुली येथे घरफोडी केलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात.. ⚡कणकवली ता.१२-: कळसुली (ता. कणकवली) येथील विनायक दळवी यांच्या घरात झालेल्या दिवसाढवळ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल १७ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संतोष रामाप्पा नंजन्नावर (रा. शिरोळ, जि. कोल्हापूर, मुळ रा. नेरली, ता. हुक्केरी,…

Read Full News

कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांना पदोन्नती…

आता रत्नागिरीचे जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी.. ⚡कुडाळ ता.१२-: कुडाळ तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या वीरसिंग वसावे यांची अलीकडेच जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.       वीरसिंग वसावे यांनी दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ येथे तहसीलदार म्हणून…

Read Full News

अजित सांगेलकर यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश…!

⚡सावंतवाडी ता.१२-: ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी अजित सांगेलकर यांनी आज आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश आज रात्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात संपन्न झाला. यावेळी केसरकर यांनी त्यांचे स्वागत करून निश्चितच तुमचं पक्षाकडून योग्य मान सन्मान राखला जाईल असा विश्वास त्यांनी दिला.

Read Full News

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार…

नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर काँग्रेस लढणार:पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांची घोषणा.. ⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने स्वबळाचा झेंडा उभारला आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदांच्या जागांवर काँग्रेस हाताच्या निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस व पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांनी दिली. कणकवली काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या…

Read Full News

१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ जिल्ह्यात सहकार सप्ताहाचे आयोजन…

⚡ओरोस ता १२-: दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणारा सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या सप्ताहात देशभरातील सर्व सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्राशी संबंधित संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराचा प्रचार व प्रसार करतात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४…

Read Full News

You cannot copy content of this page