⚡सावंतवाडी ता.०३-: शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत अटल नवोन्मेष अभियान, निती आयोग आणि ए .एल. सी. टी. ई. यांच्या सहकार्याने आयोजित विकसित भारत बिल्डथोन २०२५ या देशव्यापी नवोन्मेष उपक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे.
या नवोन्मेष चळवळीत देशभरातील तीन लाखांहून अधिक माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील पाच कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्कूल बिल्डथोन उपक्रमात कोर्स पूर्ण करणे व प्रोजेक्ट तयार करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोर्टलवर सबमिट करणे असे दोन टप्पे होते. दोन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सर्व टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवत प्रशालेच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रोजेक्ट पुढीलप्रमाणे :
१) प्रोजेक्ट – स्मार्ट सिटी
विद्यार्थी : कु. दुर्वांक किशोर वालावलकर, कु. राजदीप उदय बांदेलकर, कु. स्वयंम अप्पाजी पाटील, कु. चिन्मय विक्रम कोटणीस
२) प्रोजेक्ट – हँडी मायक्रोस्कोप
विद्यार्थी : कु. सोहम गुरुनाथ चितारी, कु. अर्णव नंदकुमार गावडे, कु. ओम सखाराम तीळवे
३) प्रोजेक्ट – रेन वॉटर हार्वेस्टिंग
विद्यार्थी : कु. नितेश नारायण सावंत, कु. काशीराम गणेश सावंत
४) प्रोजेक्ट – जिओ थर्मल एनर्जी पॉवर प्लांट
विद्यार्थी : कु. पियुष नाना शिर्के, कु. प्रथमेश विलास सोनटक्के, कु. अनुराग विजय ठाकर, कु. देवेश सुधाकर आडेलकर
या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
या उपक्रमासाठी विज्ञान प्रमुख सोनाली बांदेलकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रोजेक्टच्या व्हिडिओ शूटिंगसाठी डी. ई. सारंग यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, पर्यवेक्षक सुबोध वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
