⚡सावंतवाडी ता.०३-: सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत शनिवार दि . ०३ – ०१ – २०२६ रोजी ” छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन पालक – शिक्षक कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा श्रीम. शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी पालक शिक्षक कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
प्रशालेतील केजी विभाग व इ. १ली ते १०वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या उपक्रमात विविध चविष्ट पदार्थांची विक्री केली.
यामध्ये विद्यार्थ्यांनी भाज्या व फळे वापरून सँडविच , चीझ सँडविच ,फळांचे ज्यूस, केक , ब्रेड पिझ्झा , चिकन मलाई ,चिकन रोल , फ्रुट कस्टर्ड , डोनट्स, न्युडलस , बर्गर, वेफर चाट , भेळ, विठ्ठल वडा , ,पाणीपुरी , शेवपुरी , मिल्कशेक , कोल्ड कॉफी, लिंबू सरबत , पाव – भाजी, ओरिओ डेझर्ट , चिकन बिरयानी , गाजर हलवा , केक, , डोनट , मोमोस , कॉर्न चाट , चिकन स्टिकस् इ . पदार्थ पालकांच्या मदतीने बनवले . तसेच विद्यार्थ्यांनी या पदार्थांची सुंदर सजावट करून अतिशय चांगल्याप्रकारे त्यांचे सादरीकरण केले. प्रशालेने राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडण्यास मदत झाली . तसेच विद्यार्थ्यांना विविध खाद्यसंस्कृतींची ओळख होण्यासोबतच सहकार्य, स्वच्छता व संघभावना यांचे महत्त्व शिकता आले व उद्योग जगाची ओळख झाली .पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशालेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले . याचे पालकांकडून विशेष कौतुक होत आहे .
यावेळी सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम . निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी , पालकवर्ग , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले .
