यशस्वी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप तोरस्कर यांची निवड…

⚡कणकवली ता.०३-:
शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, कणकवलीच्या कर्मचाऱ्यांची यशस्वी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कणकवली या संस्थेची सन २०२५-२६ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता नवनियुक्त संचालक मंडळातून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली.

या निवड प्रक्रियेत संदीप अरुण तोरस्कर यांचे नाव अध्यक्षपदासाठी राजेंद्र महादेव सावंत यांनी सुचविले, तर किशोर मारुती राऊत यांनी त्यास अनुमोदन दिले. सर्वानुमते संदीप तोरस्कर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सीताराम बाळा इकाळे यांच्यासह संचालक कविता राणे, सायली लाडगांवकर, करुणा घाडीगांवकर, प्रशांत वाळवे, सदानंद साटम, मिलिंद सावंत, अनिल कम्मार, दीपक चव्हाण, उत्तम शिरसाट, विश्वनाथ गंवडळकर, प्रकाश कामतेकर आदी उपस्थित होते. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून कणकवली सहाय्यक निबंधक कार्यालयातील सुनिता आशिष भोगले यांनी कामकाज पाहिले.

नवनियुक्त अध्यक्ष संदीप तोरस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना, संस्थेचे उत्पादनाचे स्त्रोत मर्यादित असले तरी प्रभावी नियोजन व पारदर्शक कामकाजाच्या माध्यमातून संस्था अधिक सक्षम व नावारूपास आणण्याची ग्वाही दिली.

यशस्वी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नवनियुक्त अध्यक्ष व संचालक मंडळाचे संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, तसेच सर्व संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page