राज्यस्तरीय युवा महोत्सवात देवगडच्या केळकर महाविद्यालयाचा ढोल नृत्यात द्वितीय क्रमांक…

⚡देवगड ता.०३-: महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचनालय आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ अंतिम फेरी माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आली.

या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड च्या विद्यार्थ्यांनी ढोल नाच हे लोकनृत्य उत्कृष्टरित्या सादर केले व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या नृत्यामध्ये साहिल दीपक जाधव, शिवमनी पाळेकर,विनीत चव्हाण, प्रफुल्ल हजारे,पार्थ नाईकधुरे, साईनील धुरे,अभिषेक शिंदे,तनिष नाईक,साहिल दिलीप जाधव, योगीराज नार्वेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नृत्याचे दिग्दर्शन श्री. सागर सारंग आणि श्री. रोहित माने यांनी केले होते. तरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षण विकास मंडळ, देवगड चे सर्व संस्था पदाधिकारी , महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page