फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात…

⚡दोडामार्ग ता.०३-:
फ्रिक्वेन्सी प्री-स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. लहान वयात दिले जाणारे शिक्षण व संस्कार मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घडवतात, असे मत तहसीलदार राहुल गुरव यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी व अभिनयाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे मान्यवर व पालकांनी कौतुक केले.
यावेळी पत्रकार तेजस देसाई, जीवन विद्या मिशनचे राजाराम सावंत, नगरसेविका सौ. संध्या प्रसादी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल नाईक यांनी केले. प्रास्ताविक कीर्ती खोबरेकर यांनी, तर आभार शितल पटकारे यांनी मानले.

You cannot copy content of this page