सामाजिक कार्यकर्ते मोहन पालेकर यांच्याहस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन..
⚡सावंतवाडी ता.०३-: न्हावेली गावातील खेळाडूंसाठी आयोजित न्हावेली प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेंचे शानदार उद्घाटनं न्हावेली गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते मोहन पालेकर यांच्याहस्ते करण्यात आले .यावेळी न्हावेली उपरासपंच अक्षय पार्सेकर न्हावेली गावचे मानकरी भिवा नाईक , दीपक नाईक न्हावेली गावचे युवा नेतृत्व प्रसाद गावडे , समीर पार्सेकर, सुनील न्हावेलकर, सुंदर पार्सेकर, अजय पार्सेकर, राज धवन, ओंकार निर्गुण अंकित घोगळे , दीपक नाईक, विठ्ठल नाईक उपस्थित होते.
क्रीडा प्रेमींसाठी ही न्हावेली प्रीमियर लीग मेजवानी ठरणार असून,गावातील खेळाडूंना या स्पर्धेतून आपल कौशल्य दाखविता येणार असल्याचे उद्घाटक पालेकर यांनी सांगितले.तसेच ३ व ४ जानेवारीला होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेला क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असेही आवाहन केले आहे.
