“आजचे संवर्धन, उद्याची सुरक्षितता” पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र…

विनायक धुरी:विद्यार्थ्यांत पर्यावरण जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती रॅली..

⚡देवगड ता.०३-: “आजचे संवर्धन, उद्याची सुरक्षितता” हा विचार पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र आहे. असे प्रतिपादन पंचायत समिती देवगडचे श्री.विनायक धुरी यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत तालुका विधी सेवा समिती , देवगड व तालुका वकील संघटना , देवगड आयोजित “ आजचे संरक्षण उद्याची सुरक्षितता पर्यावरणीय विधी साक्षरता व समुदाय संरक्षण उद्याची सुरक्षितता “ या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव , श्री.एस.आर.जाधव , श्री.संदीप शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना श्री.विनायक धुरी पुढे म्हणाले की आज आपण निसर्गाचे जतन केले तरच उद्याचे जीवन सुरक्षित राहील. पाणी, हवा, जमीन, वनसंपदा यांचा अतिरेकी वापर थांबवून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. वृक्षतोड थांबवणे, वृक्षारोपण करणे, पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.
पर्यावरणाचा समतोल राखला तर हवामान बदल, दुष्काळ, पूर यांसारख्या संकटांपासून संरक्षण होऊ शकते. आजची जाणीव आणि कृतीच उद्याच्या पिढीसाठी सुरक्षित, निरोगी व समृद्ध भविष्य घडवू शकते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक , स्वागत व आभार प्रदर्शन श्री.एस.आर.जाधव यांनी केले.

You cannot copy content of this page