Headlines

ओटवणे शाळा नं.१ येथे सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनतर्फे शैक्षणिक साहित्य वितरण..

⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन असोसिएशनचे इलियास गोम्स, जिल्हा खजिनदार तथा कार्यकारी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, उपाध्यक्ष बॅन्हर परेरा, सदस्या सौ सिल्व्हिया फर्नांडिस, पेरपे दिन…

Read Full News

बांदा येथे १३ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१९-: मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी, बांदा यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नाडकर्णी…

Read Full News

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीसाठी घरोघरी. .

गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण:तरंगकाठीचे घरोघरी विधीवत व भक्तिभावाने पूजन.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथे पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सोमवारपासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरी आलेल्या तरंगकाठीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत…

Read Full News

कुडाळच्या एसआरएम महाविद्यालयाला उद्योग ऑटोमेशनसाठी आयओटी किट प्रदान…

कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची ज्योत प्रज्वलित व्हावी, जिज्ञासा वाढावी ,शोधक वृत्ती वाढावी यासाठी एका विशेष कार्यक्रमात टिम ए.एस.व्ही. कन्सल्ट प्रा.लि.चे चेअरमन ए. एस. विश्वनाथन यांनी उद्योग ऑटोमेशनसाठी उपयुक्त असे अत्याधुनिक आय.ओ.टी. आधारित उपयुक्त असे किट महाविद्यालयाला भेट दिले आहे.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश बागल (सीनियर आय.टी.कन्सल्टंट), धिरेन्द्र शिरधनकर (उत्कर्ष…

Read Full News

विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी…

कुडाळ: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी असून ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट 3212 मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान अनमोल असल्याचे प्रतिपादन ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले. ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 व रोटरी क्लब…

Read Full News

टोपीवाला वाचनालयाच्या विविध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद…

ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त पाठांतर आणि भक्तीगीत गायन स्पर्धा… ⚡कुडाळ ता.१९-: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे राव बहाद्दूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळच्या वतीने कै. वामनराव नाडकर्णी स्मृती पाठांतर व भक्तीगीत गायन स्पर्धा ग्रंथालयात पार पडल्या. या स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाठांतर स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी तर भक्तीगीत गायन स्पर्धेत…

Read Full News

समर्थ साटम महाराजांच्या चरणी बांद्यातील पदयात्री लीन…

⚡बांदा ता.१८-: साटम गुरुवर माझे आई, मजला ठाव द्यावा पायी , हा गजर करत नामस्मरण व भजन करून बांदा येथून पदयात्रेने दाणोलीला श्री साटम महाराज समाधी मंदिरात आलेले पदयात्री व भाविक श्री साटम महाराजांच्या चरणी लीन झाले. बांदा ग्रामस्थांची दाणोली पदयात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली . सकाळी ग्रामदैवत श्री बांदेश्वर भूमिका…

Read Full News

आमची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच राहणार…

मंत्री नितेश राणे: केसरकरांना राजघराण्यांनी भरपूर आशीर्वाद दिलाय,त्यामुळे त्यांनी अजूनही विचार करून आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: “आमचा प्रचार आधीपासूनच सुरू आहे. आज मी फक्त श्री देव पाटेकरांचे आशीर्वाद घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे,” असे विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडीत केले. यावेळी ते बोलतना पुढे म्हणाले की, निवडणूक ही केवळ…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत भाजपचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१९- : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचाराचा जोरदार शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला. श्री देव पाटेकर यांच्या चरणी श्रीफळ वाढवून हा प्रचारारंभ पार पडला. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत…

Read Full News

प्रभाग क्र. 1 मध्ये भटवाडी विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर येथे श्रीफळ ठेवून सौ दिपाली भालेकर व श्री राजू बेग यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१९-: भाजपचे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार सौ दिपाली भालेकर व राजू बेग यांनी आज दत्त मंदिर व विठ्ठल मंदिर येथे श्रीफळ ठेवून युवराज लखन राजे भोसले साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग एक चे उमेदवार सौ दिपाली भालेकर राजू बेग माजी नगरसेवक आनंद योगी भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर बुथ अध्यक्ष रवींद्र…

Read Full News

You cannot copy content of this page