कुणकेरी–चावडीवाडी रस्ता मजबुतीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०८-:
कुणकेरी येथील चावडीवाडी रस्त्याच्या बहुप्रतिक्षित मजबुतीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी अडचण दूर होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक श्री. महेश सारंग उपस्थित होते.

यावेळी कुणकेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सोनिया सावंत, उपसरपंच श्री. सुनील परब, शक्तीप्रमुख श्री. बाळकृष्ण सावंत, बूथ अध्यक्ष श्री. संदेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय श्री. रघुनाथ गावडे, विश्राम सावंत, कृष्णा मेस्त्री, गुरु परब, मानसी परब, अनुराधा गावडे, पप्पू सावंत, सूर्यकांत मडवळ, दाजी गावडे, भाऊ मेस्त्री, महेश मेस्त्री, आत्माराम परब, मोहन स्वार, बाबू गुरव, प्रजोत गुरव, दिनेश परब, बाबुराव नाईक, प्रवीण गावडे, सखाराम गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे चावडीवाडी परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे ठरणार आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page