गुळदुवे येथील खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार…?

ग्रामस्थांचा सवाल:रस्त्याच्या बाजूचा मातीचा भराव कोसळून पिण्याच्या पाण्याच्या तळीला , बागायतीला निर्माण झाला आहे धोका..

⚡सावंतवाडी ता.०८-: मळेवाड ते आरोंदा जाणारा मुख्य रस्त्यावर गुळदुवे शेटकरवाडी येथील मागील वर्षी २०२५ रोजी साधारण जूनच्या महिन्यात येथील मुख्य रस्त्यावरील शेटकरवाडी येथील रस्ता एका बाजूने खचला होता.याबाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती.याची दखल घेत बांधकाम विभागाने येथे तात्पुरत्या स्वरूपात धोकादायक ठिकाणी बॅरीकेट्स् लावले व दिवाळी नंतर काम सुरू करणार असल्याचे सांगितले मात्र २०२६ उजाडले तरी अजूनही या धोकादायक ठिकाणचे काम सुरू न झाल्याने येथील रस्ता अधिकच खचत ,कोसळत चालला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वळण असून या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यात करून बाजूलाच येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तळी असून ,ही तळी सुद्धा या कोसळत चाललेल्या रस्त्याच्या बाजूची माती पिण्याच्या पाण्यात पडून पाणी दूषित होत आहे.

हा रस्ता लवकरात दुरुस्त होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन बांधकाम विभागाला दिले आहे.
बांधकाम विभागाने या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि पुढे होणारे नुकसान,एखादी दुर्घटना टाळावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page