वेंगुर्ल्याचे अजित साटेलकर यांना उद्यानविद्येत पीएच.डी पदवी…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे कृषि अधिकारी या पदावर कार्यरत असलेले अजित गुरूनाथ साटेलकर यांनी महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपुर, राजस्थान येथे, डॉ. आर. ए. कौशिक व डॉ. बी. आर. साळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या या विषयात पीएच.डी पदवी संपादन केली आहे. डॉ. अजित साटेलकर यांनी “फणसामचील बियांच्या साठवणुकीचा अभ्यास व फणसाचे कलम यशस्वी होण्यासाठी योग्य महिन्याची निवड” या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला होता.
नुकत्याच पार पडलेल्या महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपुर, राजस्थान या विद्यापिठाच्या १९ व्या पदवीदान समारंभात कुलपती तथा राज्यपाल हरीभाऊ बागडे, राजस्थान यांचे हस्ते डॉ. अजित साटेलकर यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रम, डॉ. किरोडीलाल मीना, कृषि मंत्री, राजस्थान व प्राध्यापक डॉ. भगवती प्रसाद वर्मा चेअरपर्सन ऑफ युनेस्को रन, महात्मा गांधी इंस्टिटयूट ऑफ पीस अॅड सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
डॉ. अजित साटेलकर यांचे प्राथमिक शिक्षण, वेंगुर्ला शाळा नं. ४ मध्ये, दहावीपर्यंत शिक्षण वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला, महाविद्यालयीन शिक्षण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय तर बीएससी एग्रीकल्चर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि एमएससी एग्रीकल्वर (उद्यानविद्या), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे झाले असून त्यांनी, पीएच.डी पदवी महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपुर, राजस्थान येथे प्राप्त केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

राजस्थान : मान्यवरांच्या हस्ते सनद स्वीकारताना अजित साटेलकर, सोबत अन्य

You cannot copy content of this page