Headlines

मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला…

बिबट्याने केली युवकाची पाठलाग:- भयभीत झालेल्या सतीश नाईक यांनी लागलीच वनविभागाला संपर्क करून घटनेची दिली माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना ,घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी(खुळादेववाडी) येथे झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या…

Read Full News

शिरोडा येथील पाण्याच्या समस्याबाबत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

.. अन्यथा ग्रामस्थांचे 26 जानेवारी रोजी उपोषण ⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या टाकीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा त्वरित सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा कार्यक्षेत्रातील नळपाणी योजनाधारक व ग्रामस्थ यांच्यावतीने शिरोडा सरपंचा लतिका रेडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गुरुवारी (1 जानेवारी) देण्यात आला…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…

⚡वेंगुर्ला ता.०२-: तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथे मित्रप्रेम कला – क्रीडा मंडळातर्फे आयोजित व पुरस्कृत करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न आज शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक सुभाष कासले व जनार्दन कासले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रल्हाद सोनसुरकर, सचिन गडेकर, कुलदीप परब, जीजी गडेकर, मित्रप्रेम संघांचे ज्येष्ठ खेळाडू दादा आईर, समिर गडेकर, सत्यवान कुडाळकर, दिलीप सोनसुरकर, किशोर…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या क्रीडा दिनाचे आयोजन 27 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लेझीमच्या शिस्तबद्ध तालावर संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, सदस्य श्री जयप्रकाश सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे…

Read Full News

समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेला भरघोस प्रतिसाद…

1779 किलो कचरा आणि 1035 किलो प्लास्टिक संकलित:मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची मेढा किनारी उपस्थिती.. ओरोस ता २स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्याल येणारे देशी- विदेशी पर्यटक हे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात भेटी देतात. जिल्ह्यात येणा-या पर्यटकांना आपण जर स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे देऊ शकलो तर…

Read Full News

आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ‘वाचन पंधरवडा उपक्रम साजरा’…

⚡दोडामार्ग ता.०२-: आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम पार पडत आहे. त्यावेळी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले, तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले गेले होते. याचबरोबर ग्रंथ परीक्षण स्पर्धा, ग्रंथदिंडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत चालला आहे. घरातील पुस्तकाची…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेकडून शववाहिनी सेवा सुरू…

नगरसेवक बाबू कुडतरकर: गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेला संपर्क साधावा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी नगरपरिषद येथे शासनाच्या माध्यमातून शहरासाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंत्ययात्रेसाठी या गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन शिंदे शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले आहे.

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यासाठी भाजपाचे नेहमी प्रयत्न…

मनीष दळवी:पाल गावात २ कोटी रुपयांच्या तीन विकास कामांची भूमिपूजन.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: तालुक्यातीलपाल गावातील तीन महत्वाच्या विकास कामांना मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून आणि बजेट मधून मिळून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन बुधवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजप तालुकाध्यक्ष विष्णू…

Read Full News

म्हापण-पाट येथे रिक्षा चालक-मालक संघटनेचा भव्य लकी ड्रॉ उत्साहात…

भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: म्हापण-पाट येथे रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट व पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून रिक्षा चालक व स्थानिक ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाला संबोधित…

Read Full News

टाकाऊ साहित्याला लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळाल्या…

कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला आग लागली. ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात आली. कुडाळ पोलीसांसह अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील झाडाखाली नजिकच्या गॅरेज मधील दोन नादुरुस्त दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या आगीत जळून खाक…

Read Full News

You cannot copy content of this page