मी कुठेही गेलेलो नाही, मी ठाकरे शिवसेनेतच…

माझ्या बद्दल चुकीचे गैरसमज:निशांत तोरसकर यांचे स्पष्टीकरण,राजन तेलींच्या नव्या राजकीय इनिंगला माझ्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.०३-:*  मी कुठेही पक्षप्रवेश केलेला नाही मी ठाकरे सेनेतेच आहे. माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. माजी आमदार वैभव नाईक,  बाबुराव धुरी, रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली मी शहरात शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करत राहणार असून लोकांच्या हिताच्या प्रश्नासाठी मी सतत शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी दिली.

दरम्यान काल मुंबई येथे ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळावा देखील पार पडला यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे मी कुठेही अद्याप गेलेलो नाही. माजी आमदार राजन तेली जरी आज शिंदे शिवसेनेत गेले असले, तरी त्यांना नव्या राजकीय इनिंगला माझ्या शुभेच्छा आहेत असे त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.

You cannot copy content of this page