⚡बांदा ता.०३-: बांदा शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातांचे भव्य मिरवणूकीने व ढोल ताशांच्या गजरात तेरेखोल नदीपात्रात काल (गुरुवार) सायंकाळी उशीरा विसर्जन करण्यात आले.
शहरात गांधीचौक, कट्टा कॉर्नर, आळवाडी, निमजगा येथे नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातांचे पूजन करण्यात आले होते. गेल्या ९ दिवसात विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला व मुलांसाठी विविध स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामुळे शहरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.
काल सायंकाळी उशिरा विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. पारंपारीक ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रात भक्तीपूर्ण वातावरणात दुर्गामातांचे विसर्जन करण्यात आले.
फोटो :-
बांदा येथे गांधीचौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातेचे भव्य मिरवणूकीने विसर्जन करण्यात आले. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
बांदा शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातांचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन…!
