⚡वेंगुर्ला ता.०३-: प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील रवळनाथ मंदिर परिसरात दस-याच्या शुभमुहूर्तावर शिवलग्न कार्यक्रम बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या लग्नानंतर तरंगदेवता रामेश्वर मंदिर येथे पाहुणचारासाठी आल्या. याठिकाणी त्यांची विधीवत पूजा झाल्यावर अवसारी स्वरुपात उपस्थित भाविकांना कौल देण्यात आला आणि त्यानंतर तरंगदेवता सातेरी मंदिरात विसावल्या. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या तरंगदेवतेचे दर्शन घेत श्रीफळ ठेवले.
फोटोओळी – बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत शिवलग्न संपन्न झाले.
शिवलग्न सोहळा संपन्न…
