जिल्ह्यात एकूण ४ हजार ९१० जण कोरोना मुक्त….
सक्रीय रुग्णांची संख्या २३१ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *ð«सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९१० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
