शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदी प्रशांत कोठावळे यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.३०-:* शिवसेना प्रणीत महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदी सावंतवाडीतील प्रशांत कोठावळे यांची निवड मा. शिवसेना पक्षप्रमूख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार संघटनेचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष निलेश उर्फ आप्पा पराडकर यांनी केली त्याबाबतचे नियुक्ती पत्र पराडकर यांनी त्यांना दिले. ह्या प्रसंगी हिंदभारतीय जनरल कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस घनःशाम नाईक, माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेटये, रिमेश चव्हाण, योगेश दळवी, राजू राठोड, बाळा दळवी, अपर्णा कोठावळे आदि उपस्थित होते.

शिवसेनेच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून शिवसेना संघटना वाढी बरोबरच इथल्या भूमीपूत्राना न्याय मिळवून देण्यासाठी माथाडी कामगारांचे प्रश्न हाताळले जातील असे यावेळी प्रशांत कोठावळे यांनी सांगीतले, ह्या संघटनेचे सल्लागार खासदार विनायक राऊत व खासदार राहुल शेवाळे हे आहेत.

या निवडी बद्दल खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमूख संजय पडते, महीला जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत, सतिश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे तालूका प्रमूख रुपेश राऊळ व शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करुन पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

You cannot copy content of this page