मळगाव बाजारपेठेत शुकशुकाट

*बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी : अत्यावश्यक सेवा सुरू *💫सावंतवाडी दि.०३-:* सहदेव राऊळ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठ सॅनिटाईझ करण्याच्या पार्श्वभूमीवर आज मळगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. यावेळी बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद असल्यामुळे बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट जाणवत होता. मळगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मळगाव…

Read More

बेधुंद पर्यटकांची ‘वरात’ पोलीस ठाण्यात

तारकर्ली गावातील घटना : दगडफेक व मारहाणीच्या घटनेत ग्रामस्थ जखमी *💫मालवण दि.०३-:* पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली गावात बुधवारी रात्री बेधुंद पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थांना मारहाण केल्याची घटना घडली. पर्यटकांच्या कारने दुचाकीस्वरास धडक दिली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना ही मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी पर्यटकांना थेट पोलीस ठाण्यात नेले….

Read More

कणकवलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन…

*💫कणकवली दि.०३-:* कृषी विधेयकविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि सरकारने आणलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज धरणे आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस एम. एम. सावंत,…

Read More

भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून…!!

संस्थानची माहीती;शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा होणार… *💫कणकवली दि०३-:* शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने यंदा हा उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवात सर्व धार्मिक विधी होणार आहेत. मात्र महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची…

Read More

फ्लायओव्हर उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करता येणार नाही-आ.नितेश राणे..

कणकवली शहरातील महामार्ग कामासंदर्भात समस्यांबाबत आढावा बैठक; अनेक मुद्द्यांवर आमदार नितेश राणे झाले आक्रमक.. *💫कणकवली दि.०३-:* कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम करत असताना ज्या समस्या निर्माण होत आहेत.त्या संदर्भात कार्यकारी अभियंता म्हणून तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे. ज्याठिकाणी बॉक्सवेल कोसळला आहे, त्या ठिकाणी वाय आकाराचे उड्डाणपूल उभारले पाहिजे. केंद्राकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे अधिक…

Read More

नवीन कुर्ली विकास समितीच्या अध्यक्षपदी अनंत पिळणकर यांची फेरनिवड ….

*💫कणकवली दि.०३-:* राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांची नवीन कुर्ली विकास समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या गावसभेत हा निर्णय घेण्यात आला. १० वर्षानंतर नव्या कार्यकारिणीच्या फेरनिवडीसाठी हि सभा घेण्यात आली होती. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात कुर्ली गावाचे विस्थापन झाले. फोंडा गावच्या माळावर नवीन कुर्ली गाव वसला. यावेळी गावच्या समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने…

Read More

सार्वजनिक रस्त्याची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी डॉ. जितेंद्र केरकर यांचे आमरण उपोषण….

*💫मालवण दि.०३-:* तारकर्ली येथे सार्वजनिक रस्त्याची तोडफोड केल्याप्रकरणी प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई न झाल्याबाबत तसेच कारवाईच्या तरतुदीविषयी माहिती न मिळाल्याबाबत तारकर्ली येथील डॉ. जितेंद्र केरकर यांनी आज मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी पंचायत समिती प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई होण्यासाठी ठोस माहिती न मिळाल्याने प्रशासन माहिती देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे डॉ….

Read More

मळगाव ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आढावा बैठक संपन्न

*कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन* *💫सावंतवाडी दि०३-:* मळगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी श्री. मस्के यांच्या समवेत १ डिसेंबर रोजी लोकांमध्ये जनजागृती करणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, बाजारपेठेतील…

Read More

सावंतवाडी येथे रोटरी क्लबतर्फे जागतिक दिव्यांग दिन साजरा

*💫सावंतवाडी दि.०३-:* रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने आज सावंतवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा दिवस “दिव्यांग दिन” म्हणून घोषित केला आहे. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दिव्यांग बनलेल्या या समाजातील घटकाला मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्या समस्या समजावून घेणे यासाठी हा दिवस १९९२ पासुन साजरा केला जातो. या दिव्यांगांचे प्रश्न समजावुन…

Read More

युजीसी नेट परीक्षेत कुर्ली येथील नम्रता पाटील हिचे उज्जल यश

*💫वैभववाडी दि.०३-:* कुर्ली, तालुका, वैभववाडी या गावातील कुमारी नम्रता नरेश पाटील ही सप्टेंबर 2020 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या युजीसी नेट -अर्थशास्त्र (National Eligibility Test) या राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेत घवघवीत यश संपादन करून असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी पात्र ठरली आहे. कुर्ली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलीने गावचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या यशामध्ये तीने सातत्याने अभ्यास…

Read More
You cannot copy content of this page