*कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन*
*💫सावंतवाडी दि०३-:* मळगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी श्री. मस्के यांच्या समवेत १ डिसेंबर रोजी लोकांमध्ये जनजागृती करणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा फवारणी करणे अशा विविध सूचना बैठक घेऊन करण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसातून एकदा प्रत्येक घराला भेटी देऊन कुटुंबातील व्यक्तींना खबरदारी घेण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच २ डिसेंबर रोजी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची सभा घेत त्यांनाही खबरदारी घेण्या संदर्भात मार्गदर्शन करत आठवड्यातून दर गुरुवारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुकानात येणाऱ्या व्यक्तींची माहिती रजिस्टर करून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी ग्रा.प. प्रशासक लोंढे, तलाठी निबाळकर, ग्रामविकास अधिकारी बांदेकर, उपकेंद्राचे डॉ. कलमिसकर, आरोग्य सेविका पाटील, कृषी सहाय्यक मेस्त्री आदी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.