सावंतवाडी येथे रोटरी क्लबतर्फे जागतिक दिव्यांग दिन साजरा

*💫सावंतवाडी दि.०३-:* रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने आज सावंतवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा दिवस “दिव्यांग दिन” म्हणून घोषित केला आहे. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दिव्यांग बनलेल्या या समाजातील घटकाला मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्या समस्या समजावून घेणे यासाठी हा दिवस १९९२ पासुन साजरा केला जातो. या दिव्यांगांचे प्रश्न समजावुन घेणे, त्यावर मार्ग, उपचार, आर्थिक सहाय्य करुन या घटकाला दिलासा देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अशा लोकांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्था इमानेइतबारे आपले कार्य करीत असतात. बऱ्याच दानशुर संस्था आणि व्यक्ति या संस्थाना मदतही करीत असतात. पण समाजाला या घटकाची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून असे दिवस साजरे केले जातात. रोटरी क्लब, सावंतवाडी आजच्या दिवसाचे औचित्य साधुन आणि रोटरीच्या “रोग नियंत्रण आणि उपचार” या कार्यक्रमा अंतर्गत दिव्यांगांसाठी “जयपुर फुट” देण्याचा मानस आहे. यासाठी ज्या दिव्यांगांना याची गरज आहे त्यानी कृपया इव्हेंट चेअरमन रो. प्रमोद भागवत 7620197590 रो. सत्यजित धारणकर – 9423304448 सचिव- रो. दिलीप म्हापसेकर 8550975242 यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत असे आवाहन अध्यक्ष-रो. डॉ. राजेश नवांगुळ यानी केले आहे. किमान 15 दिव्यांगांची मागणी असेल तर हा कॕम्प सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येईल. दिव्यांगांसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे विषेश योगदान आहे. भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयात अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागात दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणाची सुविधा उपलब्ध आहे, देशातील एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के दिव्यांगाची संख्या आहे. यात अंधत्व, श्रवण दोष, अपंगत्व, मानसिक आजार आणि इतर कोणत्याही अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

You cannot copy content of this page