फ्लायओव्हर उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करता येणार नाही-आ.नितेश राणे..

कणकवली शहरातील महामार्ग कामासंदर्भात समस्यांबाबत आढावा बैठक; अनेक मुद्द्यांवर आमदार नितेश राणे झाले आक्रमक..

*💫कणकवली दि.०३-:* कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम करत असताना ज्या समस्या निर्माण होत आहेत.त्या संदर्भात कार्यकारी अभियंता म्हणून तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे. ज्याठिकाणी बॉक्सवेल कोसळला आहे, त्या ठिकाणी वाय आकाराचे उड्डाणपूल उभारले पाहिजे. केंद्राकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे अधिक चाळीस कोटी मंजूर करा.त्यासाठी लागणारी मदत आम्ही करू, तोपर्यंत नव्या उड्डाण पुलावरुन वाहतूक सुरु करु देणार नाही, असा इशारा कणकवली आमदार नितेश राणे यांनी दिली दिला. कणकवली येथील नगराध्यक्ष दालनात शहरातील महामार्ग उड्डाणपूल काम करत असताना आलेल्या समस्यांबाबत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कार्यकारी अभियंता सलीम शेख ,दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम कुमार, कन्सल्ट एजन्सी आरटी फॅक्टचे अधिकारी उपस्थित होते.तसे न.पं. बांधकाम सभापती मेघा गांगण , गटनेता संजय कामतेकर,आरोग्य सभापती अभिजित मुसळे , नगरसेवक शिशिर परुळेकर , किशोर राणे , बंडू गांगण , अशोक करंबेळकर , नितीन पटेल , संजय मालंडकर,महेश सावंत आदी उपस्थित होते. एस.एम.हायस्कूल समोर कोसळलेल्या हायवे पुलाच्या बॉक्सवेलच्या जागी पिलर बेस वाय आकाराचा उड्डाणपूल हवा आहे.केवळ प्लेट लावलात तर आम्ही खपवून घेणार नाही. प्लेट लावायला गेलात तर काम करु देणार नाही, नगराध्यक्ष नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या समक्षच कार्यकारी अभियंता शेख याना इशारा दिला. कणकवलीत उड्डाणपुल पिढ्यानपिढ्या टिकणारे हवे आहे. कोसळले उड्डाण पुलाच्या भागापासून गांगोमंदिरापर्यंत ११० मीटर चे उड्डाणपूल बांधण्यासाठी लागणार ४० कोटींचा निधी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी याला मंजुरी देतील.त्यासाठी आम्ही आहोत ना,आमदार नितेश यांनी विश्वास व्यक्त केला. या बैठकीत २६ जानेवारी पर्यंत उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन असल्याचे गौतम यांनी सांगितले. त्यावेळी आ.नितीश राणे सह सर्वानीच विरोध केला. अपूर्ण काम असताना उड्डाणपूल वरून वाहतूक सुरू करू नका जोपर्यंत कणकवली शहरातील नागरिकांचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नाही असे नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. कणकवली शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन ४ ठिकाणी बदलून हव्यात आहेत.याबाबत महामार्ग अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले.अद्याप का केले नाही.पाणी पाईपलाईनचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता शेख यांनी दिले आहे.भूसंपादन न झाल्यामुळे पटवर्धन चौकात अद्याप आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित झाली नाही.ती तातडीने करावी.तसेच लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील काम तातडीने करावे. पटवर्धन चौक ते एसटी स्टँड दरम्यान सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे, फ्लायओव्हर चे बांधकाम झालेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावा,अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली. पटवर्धन चौकात देणार ३ आसनी रिक्षा स्टँड एसटी स्टँड समोर सहा आसनी रिक्षा स्टँड आवश्यक आहे. दुचाकी पार्किंगसाठीही जागा असावी,नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. शहरातील गटारे जिथे जिथे फुटलीत ते दुरुस्त करून द्या. गटारालगत असलेले खुले चर बुजवा // शहरातील गांगोमंदिर आणि एस एम हायस्कुल समोरील अंडरपास जवळ गतिरोधक बनवा . त्या ठिकाणी असे देखील लावून अपघात होऊ नये अशी उपाययोजना करा अशा सूचना नगरसेवक शिशीर परुळेकर यांच्या मागणीवर आमदार नितेश राणे यांनी दिल्या. कणकवली शहरातील सर्विस रस्ते खड्डेमय आहे त्या ठिकाणी तातडीने रस्ते करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली त्यावर दिलीप बिल्डकॉन करून येत्या दोन दिवसात हे रस्ते करून देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. या बैठकीत काही मुद्द्यांवर महामार्ग कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत तुम्ही बरेच प्रश्न मार्गी लावा काम झाल्यानंतर ही कंपनी जाईल मात्र तुम्हाला काम करावे लागेल आम्ही नागरिकांच्या प्रश्नांसाठी गप्प बसणार नाही असा इशारा देखील आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page